Fri, Apr 26, 2019 19:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुर्ला स्टेशनजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प

कुर्ला स्टेशनजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प

Published On: Sep 14 2018 5:42PM | Last Updated: Sep 14 2018 5:42PMमुंबई : प्रतिनिधी

कुर्ला स्टेशनजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हार्बर लाईनवरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल आहेत. ऐन सणासुदीच्यावेळीच नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत असल्याने या खोळंब्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

कुर्ला स्टेशनजवळ ही घसरलेली मालगाडी थांबली आहे. लोकलची वाट पाहताना लोकल प्रवाशांच्याकडून रेल्वे प्रशासनाच्या कारभाराला दोष दिला जात आहे. रेल्वेकडून याची दखल घेण्यात आली असून एक लोकल गाडी सोडण्यात आली आहे.