होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक- मुख्यमंत्री 

शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक- मुख्यमंत्री 

Published On: Mar 12 2018 12:28PM | Last Updated: Mar 12 2018 12:28PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली मुंबईत दाखल झालेल्या हजारो शेतकरी आणि शेतमजूरांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक व संवेदनशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. तसेच किसान मोर्च्याच्या शिष्टमंडळाला दुपारी 1 वाजता बैठकीसाठी बोलवल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.  

शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईतील आझाद मैदानात पोहोचल्यानंतर त्याचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. यावर निवेदन देताना मुख्यमंत्र्यांनी मोर्च्याच्या शिस्तबद्धतेचे कौतुक केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आणि संवेदनशील आहे. या मागण्यांवर निश्चित कालमर्यादा तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.  

संबंधित बातम्या:

मनातला संताप विसरू नका : राज यांचे लाँग मार्चला आवाहन 

मुंबईच्या डबेवाल्यांकडून लाँग मार्चमधील शेतकर्‍यांना अन्‍नदान