Sun, May 31, 2020 15:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पुढारीचे ‘महा’सर्वेक्षण: आता फडणवीस फॅक्टर! 

पुढारीचे ‘महा’सर्वेक्षण: आता फडणवीस फॅक्टर! 

Published On: May 04 2018 9:56AM | Last Updated: May 04 2018 10:03AMमोठी उत्सुकता होती ती ‘जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण’, या प्रश्‍नाबद्दल. आगामी विधानसभा निवडणुकीत ‘मोदी फॅक्टर’ तेवढा प्रभावी ठरणार नाही, असा बहुसंख्य मतदारांचा कल आहे. भाजप-शिवसेना सरकारबद्दल बहुमताने नाराजी व्यक्त करतानाच 25 टक्के मतदारांनी देवेंद्र फडणवीस यांनाच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली. त्याखालोखाल अजित पवार 18, तर उद्धव ठाकरे 15 टक्के पसंतीचे धनी ठरले. पृथ्वीराज चव्हाण 11 टक्के मतदारांना मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून 9 टक्के मतदारांनी पसंती दिली. पंकजा मुंडे व सुप्रिया सुळे यांना प्रत्येकी फक्त 5 टक्के मतदारांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.

‘मुख्यमंत्री कोण’, या प्रश्‍नाच्या उत्तरात अशी जी अनेक उत्तरे मतदारांनी या सर्वेक्षणातून दिली, त्यातून अनेक प्रश्‍न मात्र उभे राहतात. या सर्वेक्षणात विदर्भ विभागाचा समावेश नव्हता, तरीदेखील मुख्यमंत्री फडणवीस अग्रस्थानी आहेत. याचा अर्थ फडणवीस यांनी राज्यात सर्व भागांत आपला प्रभाव निर्माण केला आहे, तर मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतील इतरांचे नेतृत्व आपापल्या प्रभावक्षेत्रात मर्यादित असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट होते. काँग्रेसचे पारंपरिक मतदानदेखील होताना या सर्वेक्षणात दिसत नाही. याचा काँग्रेसला फार विचार, फेरविचार करावा लागणार, असे दिसते.

Image may contain: 9 people, people smiling

संबंधित बातम्या

वाचा : ‘महा’सर्वेक्षणाचे इन्फोग्राफिक्स: आता निवडणूक झाली, तर...

वाचा : पुढारीचे ‘महा’सर्वेक्षण: लोक सरकारवर नाराज; पण...

वाचा : ‘महा’सर्वेक्षण: ‘आईना तो वही दिखायेगा, जैसे आप हो!’

वाचा : युती-आघाडीचे राजकारण अटळ! पुढारीचे ‘महा’सर्वेक्षण 

वाचा : जनतेच्या मनाचा ठाव घेणारा व्यापक सर्व्हे : डॉ. योगेश जाधव 

Tags : survey2018, Kaul Marathi Manacha, daily pudhari, abp majha, survey, maharashtra, politics