होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयआरएस अधिकाऱ्याच्या गाडीची धडक; एक ठार

आयआरएस अधिकाऱ्याच्या गाडीची धडक; एक ठार

Published On: Feb 21 2018 12:29PM | Last Updated: Feb 21 2018 12:29PMमुंबई : प्रतिनिधी

आयआरएस अधिका-याच्या भरधाव गाडीने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे मानखुर्दमध्ये घडली. या अपघाताप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी आयएएस अधिकारी शक्तिवेल राजू यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना जमीन मंजूर केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या महितीनुसार, सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास मानखुर्द पोलीस चौकी येथे भरधाव वेगाने आलेल्या राजू यांच्या गाडीने रस्त्यावरील दोघांना राजू यांच्या गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात पदचारी पांडूरंग कोकरे यांचा जागीच मृत्यु झाला, तर अशोक भंडारी जखमी झाले असल्याची माहिती मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय येरनेकर यानी दिली. 

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या मानखुर्द पोलिसांनी याप्रकारणी गुन्हा दाखल करत आरोपी राजू यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जमीनावर मुक्तता केली आहे. यप्रकारणी अधिक तपास सुरु असून अपघातावेळी राजू हे दारुच्या नशेत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.