Mon, Aug 19, 2019 19:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लवकरच बॅकलॉग भरून काढणार: राज ठाकरे 

लवकरच बॅकलॉग भरून काढणार: राज ठाकरे 

Published On: Jan 09 2018 5:37PM | Last Updated: Jan 09 2018 5:39PM

बुकमार्क करा
मुंबई: पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर गेल्या काही दिवसांपासून कोणतीच नवी पोस्ट टाकलेली नाही. फेसबुकवर दाखल झाल्यानंतर राज यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींपासून ते राज्यातील भाजप सरकार आणि मुंबई मनपावर हल्ला चढवला होता.

गेल्या काही दिवसांपासून राज यांनी व्यंगचित्राचा तडाखा कोणालाही बसला नव्हता. मात्र, राज यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्रांच्या माध्यमातून तडाखे देणार असल्याचे सांगितले आहे. राज यांनी मंगळवारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी गेल्या वीस दिवसांत झालेल्या गोष्टींबद्दल व्यंगचित्रांच्या माध्यमातून बोलणार असल्याचे म्हटले आहे. 

नव वर्षाच्या शुभेच्छा देत राज यांनी कोणाला जर असे वाटत असेल की, ते माझ्या तडाख्यातून वाचले आहेत तर, तसेच काही समजून घेऊ नका, असा इशारा देखील दिला आहे. 

काय असेल राज यांच्या व्यंगचित्रांत

गेल्या काही दिवसांत राज्यात आणि देशात झालेल्या घटनांवर राज व्यंगचित्रांच्या माध्यमातून बोलतील अशी शक्यता आहे. कोरेगाव-भीमा येथे झालेला हिंसाचार, त्यानंतर पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद, त्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यावर राज भाष्य करू शकतात. त्याशिवाय मुंबईत झालेल्या आगीच्या दुर्घटना, गुजरात आणि हिमाचल मधील निवडणुकीचे निकाल यावर देखील ठाकरी फटकारे पाहायला मिळू शकतील. राज यांनी त्यांच्या ताज्या फेसबुक पोस्टमध्ये ‘मी अन्य सत्ताधाऱ्यांसारखा अनुशेष (बॅकलॉग) तसाच ठेवणाऱ्यातला नाही', असे म्हटले आहे.