Wed, Apr 01, 2020 14:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णाचा चौथा बळी

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णाचा चौथा बळी

Last Updated: Mar 24 2020 12:44PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्रात आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाबाधितांच्या मृतांची संख्या चार वर गेली आहे. 

युएई येथून आलेला हा रुग्ण ६५ वर्षाचा असून ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने काल (दि.२३) रोजी त्यांना उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. 

या व्यक्तीस उच्चरक्तदाब तसेच अनियंत्रित मधुमेहाचा त्रास होता अशी माहिती उपकार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे. सदर व्यक्ती, युएई येथे प्रवास करून (दि.१५) रोजी अहमदाबाद येथे आली त्यानंतर  (दि.२०) रोजी मुंबईमध्ये दाखल झाली होती. त्यांची चाचणी केली असता पॉझिटीव्ह निदान आले होते.