Fri, Mar 22, 2019 03:11
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टिटवाळा येथील जंगलात  वन कर्मचाऱ्यावर गोळीबार

टिटवाळा येथील जंगलात  वन कर्मचाऱ्यावर गोळीबार

Published On: May 17 2018 6:52PM | Last Updated: May 17 2018 6:52PMटिटवाळा (जि. ठाणे): प्रतिनिधी

टिटवाळा पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या खडवली आणि टिटवारळ्याच्या मधील दानबावच्या जंगलात वन कर्मचाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात एक कर्मचारी जखमी झाला आहे. पंकज गडरी असे जखमी झालेल्‍या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पंकज यांना उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दानबाव येथील जंगलात वन कर्मचारी पाहणी करण्यासाठी गेले असताना खांद्यावर पिशवी घेऊन संशयास्पद दोन व्यक्ती फिरत असताना आढळून आल्‍या. वन कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या दोन व्यक्‍तींनी आपल्याकडील छऱ्याच्या बंदुकीतून कर्मवाऱ्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात पंकज गडरी हे जखमी झाले. त्‍यांना तात्‍काळ ठाणे येथील ज्युपीटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी, मुरबाड राजेंद्र मोरे, टिटवाळा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे आणि पोलिस निरीक्षक जितेंद्र अहिरराव यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी भेट दिली असून, याबाबत पुढील तपास सुरु आहे.