Sat, Jul 04, 2020 12:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : महिला डॉक्टरची छेडछाड; वॉर्डबॉयला अटक

मुंबई : महिला डॉक्टरची छेडछाड; वॉर्डबॉयला अटक

Last Updated: Jun 30 2020 8:32AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

एकीकडे कोरोनाच्या महामारीच्या संकटात डॉक्टरांना आपण कोविड योद्धा संबोधतो आहोत, तर दुसरीकडे मुंबईतील जे.जे रुग्णालयातील एका महिला ट्रेनी डॉक्टरची वॉर्डबॉयने छेडछाड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल करून वॉर्डबॉयला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवार रात्रीची आहे. महिला डॉक्टर वार्डमध्ये राउंडला जात होती. त्यावेळी वॉर्डबॉयही महिला डॉक्‍टराच्या मागून आला आणि त्याने महिला डॉक्टरचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिला डॉक्टरने आरडाओरडा सुरू केल्यावर वार्डबॉय तेथून पळाला.

या घटनेबद्दल या महिलेने जेजे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल करून वॉर्डबॉयचा शोध सुरू करून त्याला अटक केली. वॉर्ड बॉय गजेंद्र गोसावी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गजेंद्र गोसावी याला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.