Thu, May 28, 2020 09:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरावीची ‘कट ऑफ’ ९५ टक्क्यांवर?

अकरावीची ‘कट ऑफ’ ९५ टक्क्यांवर?

Published On: Jul 12 2019 1:53AM | Last Updated: Jul 12 2019 1:23AM
मुंबई : प्रतिनिधी

दहावीच्या निकालात राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे पडले असले तरी 95 टक्केहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी केंद्रीय बोर्डाचे आहेत. त्यामुळे शुक्रवारी जाहीर होणार्‍या अकरावी प्रवेशाच्या यादीत नामवंत महाविद्यालय पटकविण्यासाठी केंद्रीय विद्यार्थी सरस ठरण्याची शक्यता आहे. अकरावीच्या प्रवेशात 1 हजार 487 विद्यार्थी हे 95 टक्केहून अधिक गुण मिळवणारे आहेत. त्यामुळे नामवंत महाविद्यालयांची पहिली यादी 95 टक्केहून पार करणारी असणार आहे. 95 प्लस मध्ये सर्वाधिक विद्यार्थी आयसीएसइ आणि सीबीएसई मंडळाचे असल्याने वाढलेल्या जागांचा फायदा राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना की केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांना होणार हे आता या यादीत पहायला मिळेल.

गतवर्षी अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत 90 प्लस विद्यार्थ्यांचे वर्चस्व दिसून आले असून नामांकित महाविद्यालयातील पहिल्या कट ऑफने 86 ते 93 टक्क्यांचा आकडा पार केला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचे अकरावी प्रवेशाचे चित्र वेगळे आहे. अंतर्गत गुण कमी झाल्यामुळे दहावी राज्य मंडळाचा निकाल घसरला त्यामुळे गुणवंत कमी झाले आणि त्याला उपाय म्हणून नामवंत अशा 98 महाविद्यालयात राज्य शासनाने सुमारे 9 हजार जागा वाढवल्या आहेत. असे जरी असली तर केंद्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांना 90हून अधिक टक्केवारी असल्याने पहिल्या यादीत बहुतांश जागा ते पटकावतील असे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी पसंतीक्रम दिलेल्या महाविद्यालयांची अकरावीची कट ऑफ  ही 90हून अधिक असेल आणि 95वरही पोहचेल असा अंदाज प्राचार्य मांडत आहेत. एकूण आकडेवारीत एसएससी मंडळाचे 1 लाख 68 हजार 991 विद्यार्थी असून सीबीएसईचे 5 हजार 969 आयसीएसईचे 7 हजार 881 आयजीसीएसईचे 908, आयबीचे 7, एनआयओएसचे 598 तर इतर 1 हजार 119 असे विद्यार्थी  आहेत. 90हून अधिक टक्केवारी केंद्रीय विद्यार्थ्यांची असल्याने यामुळे प्रवेशाची खरी स्पर्धा पहिल्या यादीत नव्वदीपार विद्यार्थ्यांमध्ये रंगणार आहे. रुईया, पोद्दार, रुपारेल, केसी, हिंदुजा,साठ्ये, खालसा, पाटकर आदी नामवंत महाविद्यालयांमध्ये स्पर्धा होणार आहे.