Mon, Sep 16, 2019 03:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निवडणूक तयारीच्या कामांनाही पुराचा तडाखा

निवडणूक तयारीच्या कामांनाही पुराचा तडाखा

Published On: Aug 19 2019 1:34AM | Last Updated: Aug 19 2019 1:32AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर, सांगली, सातारा व कोकणातील पूरस्थितीचा विधानसभा निवडणुकीच्या तयारीलाही तडाखा बसला आहे. विविध विभागातील सरकारी कर्मचारी व अधिकारी आपत्ती निवारण कामात गुंतल्याने मतदार याद्या सुधारणांच्या कामांना ब्रेक लागला आहे.

महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या तिन्ही राज्यांच्या निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता आहे. 25 ऑक्टोबरपूर्वी या निवडणुका होण्याची शक्यता आहे. परंतु, सांगली, सातारा, कोल्हापूर  या भागातील पाणी ओसरले असले, तरी जनजीवन अद्याप रुळावर आलेले नाही. आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी त्या त्या जिल्ह्यातील महसूल यंत्रणा जुंपली आहे.