Wed, Feb 20, 2019 15:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वयोवृद्ध शेअर दलालाची आत्महत्या

वयोवृद्ध शेअर दलालाची आत्महत्या

Published On: Oct 12 2018 1:40AM | Last Updated: Oct 12 2018 1:40AMमुंबई : प्रतिनिधी

शेअर मार्केटमध्ये आलेल्या नुकसानीमुळे नैराश्यातून विजय शशिकांत नाईक (63) या वयोवृद्ध शेअर दलालाने गुरुवारी दुपारी कांदिवलीतील आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.कांदिवलीतील जिमखाना रोड, पोयसर, पुष्पांजली इमारतीच्या ईस्ट विंगच्या फ्लॅट क्रमांक 24 मध्ये विजय नाईक हे पत्नी आणि मुलीसोबत राहात होते. पत्नी आणि मुलगी एका खासगी कंपनीत कामाला आहे, तर विजय हे काही वर्षांपूर्वीच एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले होते.

तेव्हापासून ते शेअरमध्ये गुंतवणूक  करीत. त्यांनी शेअर्समध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. गुरुवारी सकाळी शेअर मार्केट कोसळल्याचे समजताच ते प्रचंड मानसिक तणावात होते. घरचे कामावर गेल्यावर त्यांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. दुपारी नोकर घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.