Mon, Nov 20, 2017 17:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त

डोंबिवलीत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त

Published On: Nov 15 2017 2:07AM | Last Updated: Nov 15 2017 1:22AM

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

डोंबिवली पूर्वेकडील हायप्रोफाईल समजल्या जाणार्‍या एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा ठाणे ह्युमन ट्रेकिंग फोर्सने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत रॅकेट चालवणार्‍या सीमा तिवरेकर व रेश्मा बी या दोन महिला दलालांना अटक करीत 3 पीडित तरुणींची ह्युमन ट्रेकिंग फोर्सने सुटका केली आहे. या सोसायटीत सोमवारी रात्री उशिरा केलेल्या छापेमारीमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर परिसरातील राघोबा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गेल्या दोन महिन्यांपासून अनैतिक देह व्यापाराचा व्यवसाय चोरी-छुपे सुरू होता. याबाबत खबरींकडून ह्युमन ट्रेकिंग फोर्सला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटकेतील महिलांना मंगळवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस ठाण्याचे एपीआय सांळुके करीत आहेत.