Sat, Jul 04, 2020 17:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निसर्ग चक्रीवादळ कोरोनाग्रस्त महामुंबईच्या दिशेने अग्रेसर!

निसर्ग चक्रीवादळ कोरोनाग्रस्त महामुंबईच्या दिशेने अग्रेसर!

Last Updated: Jun 03 2020 2:35PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन  

संकटग्रस्त निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर (रायगडात अलिबागजवळ श्रीवर्धन, दिवेआगर येथे) धडकले. चक्रीवादळाचा केंद्रबिंदूचा परिघ 60 किलोमीटर आहे. वादळ किनाऱ्यावर धडकताना (लँडफॉल) वाऱ्यांचा वेग १०० किलोमीटर प्रतितास होता. वादळाने उरणच्या दिशेने अग्रेसर झाल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निशी चौधरी यांनी दिली. दरम्यान, मुंबई हवामान विभागाने निसर्ग चक्रीवादळ संदर्भात दुपारी माहिती दिली. त्यानुसार पुढील तीन तासात निसर्ग मुंबईत जाऊन धडकणार आहे. पुढील तीन तासांमध्ये मुंबई, ठाण्याच्या काही भागांना स्पर्शून वादळ पुढे जाईल.