Mon, Nov 20, 2017 17:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पत्नीच्या तक्रारीची शहानिशा न करता पतीला पोलीस ठाण्यात मारहाण

पत्नीच्या तक्रारीची शहानिशा न करता पतीला मारहाण

Published On: Nov 15 2017 2:07AM | Last Updated: Nov 15 2017 2:07AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीची शहानिशा न करता तक्रारदार महिलेच्या पतीस पोलीस ठाण्यात आणून गंभीर मारहाण करणार्‍या कोपरी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एस. काळबांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भटवाडी, घाटकोपर पश्चिम येथे राहणारे रवींद्र जाधव यांच्याविरोधात मे 2015 मध्ये त्यांची पत्नी सुवर्णाने कोपरी पोलीस ठाण्यात  कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. कोपरी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एस. काळबांडे यांनी या तक्रारीची कुठलीही शहानिशा न करता जाधव यांना पोलीस ठाण्यात बोलावून पेपरवेट आणि पट्ट्याने बेदम मारहाण केली. 

या प्रकरणी जाधव यांनी कोर्टात धाव घेऊन मारहाण करणार्‍या वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पत्नीविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत कोर्टाने तत्कालीन पोलीस निरीक्षक व पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. कोपरी पोलिसांनी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळबांडे व सुवर्णा जाधव यांच्याविरोधात सोमवारी गुन्हा दाखल झाला.