Sat, Jan 18, 2020 03:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर जाणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर जाणार

Last Updated: Dec 05 2019 8:38PM
मुंबई : प्रतिनिधी 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या 6 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.45 वाजता महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी दादर येथे जाणार आहेत. यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संभ्रम निर्माण करणारे मेसेजला आता पूर्णविराम मिळाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर जाण्याची जुनी परंपरा आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याबाबत आंबेडकरी अनुयायांमध्ये संभ्रम निर्माण करणारे मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल केले जात होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या चैत्यभूमी दादर येथे अभिवादन करण्यासाठी हजेरी लावणार असल्‍याने संभ्रम करणाऱ्या मेसेजेसना आता पूर्णविराम मिळाला आहे.

दादर येथील इंदू मिलच्या जागेवर राज्य शासनाकडून उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्यायाविरुद्ध तसेच विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या संदेशात त्यांनी हे विधान केले आहे.