Sun, Apr 21, 2019 06:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोक्यात दगड घालून केली युवकाची हत्या

२८ वर्षांनंतर घेतला वडिलांच्या खुनाचा बदला

Published On: Nov 09 2018 4:49PM | Last Updated: Nov 09 2018 4:45PMटिटवाळा : प्रतिनिधी

भालचंद्र व त्याचा भाऊ भागवत पावशे यांनी १९९० साली दिवाळी सणाच्या दिवशी सागर पावशे याच्या वडिलांचा खून केला होता. याच खुनाचाच बदला सागर याने दिवाळी पाडव्याच्या संध्येला सुमारे २८ वर्षानंतर कल्याण तालुक्यातील पावशेपाडा येथे भालचंद्र पावशे याच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भालचंद्र पावशे (वय-३५) असे या मृत युवकाचे नाव आहे. संशयित आरोपी सागर पावशे (वय -३४) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यानेच ही हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. 

गुरूवारी दिवाळी पाडव्याच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास कल्याण तालुक्याच्या टिटवाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील  पावशे पाडा या ठिकाणी असलेल्या पावशे पाडा येथली रहिवाशी असलेल्या भालचंद्र पावशे या युवकाची डोक्यावर  व तोंडावर दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. आरोपी सागर पावशे याने मयत पावशे याला संजय गावंडे यांच्या वरप येथील फार्म हाऊसवर नेऊन दारू पाजून त्याच्या डोक्यात दगड घालुन हत्या केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तर पावशे याचा मृत्यूदेह ताब्यात घेत उल्हासनगर येथील मध्यवर्ती रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. सदर घटनेतील आरोपी हा गावतच एका घरात लपून बसला असल्याची खबर टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक केशव नाईक यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ आरोपी सागर पावशे याला ताब्यात घेत अटक केली. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक केशव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक खोपकर करत आहेत.