Sun, Aug 18, 2019 06:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुक केलेले रेल्वे तिकीट आता करा ट्रान्सफर

बुक केलेले रेल्वे तिकीट आता करा ट्रान्सफर

Published On: Feb 12 2019 1:25AM | Last Updated: Feb 12 2019 12:56AM
मुंबई : प्रतिनिधी

लांबच्या प्रवासाला निघताना प्रवाशांकडून हमखास आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर तिकीट बुक केले जाते. मात्र काहीतरी कारणानिमित्ताने प्लान बदलावा लागला तर मात्र तिकिट रद्द करावे लागते. यात प्रवाशाला थोडेसे नुकसान सहन करावे लागते, मात्र आता आयआरसीटीसीने तिकिट ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला आहे नियमानुसार एखाद्या प्रवाशाने स्वत:चे नावे बुकिंग केलेले तिकिट दुसर्‍या प्रवाशाला वापरता येत नसे. अचानक काही कारणाने जर त्याचा प्रवासाचा बेत रद्द झाला तर त्याला तिकिट रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. शिवाय त्यात त्याचे नुकसानच होत असे, मात्र आता आयआरटीसीने रेल्वे प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेत तिकिट प्रवाशांना दिलासा दिला आहे. 

नियमानुसार रेल्वेचे तिकीट तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर ट्रान्सफर करू शकता. तुमचे आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी किंवा मुले तुमच्या तिकिटाचा वापर करू शकतात. मात्र, तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना हे तिकीट ट्रान्सफर करू शकत नाही. 

अगोदर आपल्या तिकिटाची प्रिन्ट काढून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीवर जाऊन ज्या व्यक्तीला तिकिट देणार आहात त्याचे ओळखपत्र सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. तिकिट ट्रान्सफर करण्याची विनंती केल्यानंतर ज्याच्या नावे तिकिट ट्रान्सफर करावयाचे आहे त्याविषयी तेथील अधिकारी विचारणा करुन रक्ताच्या नात्यातील पुरावा मागून तिकिट ट्रान्सफर करतील.