Wed, Feb 20, 2019 14:39



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाविद्यालयात वाचणार भगवद् गीता, वादाची शक्यता 

महाविद्यालयात वाचणार भगवद् गीता, वादाची शक्यता 

Published On: Jul 12 2018 7:43AM | Last Updated: Jul 12 2018 7:43AM



मुंबई : प्रतिनिधी

नॅक मुल्यांकन अ/अ+ श्रेणी असलेल्या महाविद्यालयांना भगवद् गीता वाचण्याचा अजब निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. संबंधीत महाविद्यालयांना भगवद् गीतेच्या संचाचे वाटप करण्यासंबंधी एक पत्रक बुधवारी काढण्यात आले. त्यामुळे या निर्णयावर वादंग होण्याची चिन्हे आहेत

मुंबई विद्यापिठांतर्गत मुंबई विभागाला संलग्न असलेल्या ज्या महाविद्यालयांना नॅक मुल्यांकन अ/अ+ श्रेणी प्राप्त झाली आहे. अशा सुमारे 100 महाविद्यालयांना भगवद् गीताच्या संचाचे वाटप करण्यात येणार आहे. महाविद्यालयांनी या भगवद् गीता लवकरात लवकर घेऊन जाव्या. तसेच भगवद् गीतांचे वाटप झालेल्या महाविद्यालयांना पावतीही सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. उच्च तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालकांनी बुधवारी या संदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. या आधी मुंबई महानगर पालिकेने शाळांमध्ये सुर्य नमस्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावरुन वादंग उठले होते. त्यामुळे भगवद् गीतेच्या वाटपाच्या शिक्षण संचनालयाने काढलेल्या पत्राने वादंग उठण्याची शक्यता आहे.  

शैक्षणिक संस्थांमधील वातावरण धर्मनिरपेक्षतेचे असावे. तेथे कोणत्याही धर्माचे धडे दिले जाता नये. त्यामुळे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा पुर्नविचार करावा, असे मत प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज टेकाडे यांनी व्यक्त केले. राज्यातील पुरोगामी लोकांनी देशाला विद्वत्ता दिली आहे. अशा महाराष्ट्रामध्ये आपण नॅकचे मुल्यांकन कीती कॉलेजांना आहे. याची पहाणी करण्यापेक्षा भगवद् गीता देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. प्रत्यक्षात सरकारने संविधानाची प्रत दिली असती, तर हे राज्याच्या पुरोगामित्वाचे उदाहरण ठरले असते. मात्र तसा विचार झाला नाही ही एक शोकांतीका आहे, असे मनविसेचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी व्यक्त केले.