Mon, Jun 17, 2019 11:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्‍ट कर्मचारी सहाव्या दिवशीही संपावर

बेस्‍ट कर्मचारी सहाव्या दिवशीही संपावर

Published On: Jan 13 2019 9:29AM | Last Updated: Jan 13 2019 9:28AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

बेस्‍ट कर्मचार्‍यांनी केलेल्या सुधारित वेतन करार, दिवाळीतील सानुग्रह अनुदान, बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. बेस्‍ट कर्मचार्‍यांच्या उर्वरित मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारसोबत शनिवारी झालेल्या बैठकीतही कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप रविवारीही सुरूच राहणार असल्याने मुंबईकरांचे रविवारही हाल होणार आहेत. सोमवारी दि. १५ रोजी यावर ठोस तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

बेस्‍ट कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट कामगार कृती समितीच्या शिष्टमंडळाची शनिवारी मंत्रालयातील मुख्य सचिवांबरोबर संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीला मुख्य सचिव डी.के. जैन, परिवहन सचिव आशिष कुमार सिंग, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर, महापालिका आयुक्त अजय मेहता, बेस्ट व्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे उपस्थित होते. 

या बैठकीदरम्यान बेस्ट कामगार कृती समितीचे शिष्टमंडळ आणि बेस्ट प्रशासनानेही सविस्तर म्हणणे सरकारसमोर मांडले. सरकारसोबत झालेली बैठक सकारात्मक झाली. मात्र मागण्या मान्य करण्याबाबत सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे संप सुरूच राहणार असल्याची माहिती बेस्ट कामगार कृती समितीने सांगितले आहे.