Fri, Oct 20, 2017 08:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपचा परतीचा प्रवास सुरू : अशोक चव्हाण

भाजपचा परतीचा प्रवास सुरू : अशोक चव्हाण

Published On: Oct 12 2017 2:07PM | Last Updated: Oct 12 2017 5:50PM

बुकमार्क करा

नांदेड : पुढारी ऑनलाईन

देशात सामन्य माणूस सोशल मीडियावर भाष्य करून लागला आहे. त्याचा धसका आता भाजपनेच घेतला आहे. त्यामुळे भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज, पत्रकार परिषदेत दिली. नांदेडमधील विजय चव्हाण यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना अर्पण केला. 
सोशल मीडियाचा वापर आवश्यक होता. पण, त्यांचा भाजपने गैरवापर केला. त्याच सोशल मीडियाचा आता भाजपने धसका घेतला आहे, असे मत खासदार चव्हाण यांनी व्यक्त केले. 


ते म्हणाले, 'सोशल मीडियाचा भाजपने गैरवापर केला. आम्ही योग्य वापर करत आहोत. नांदेडमध्ये मिळालेला विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे. मुळात भाजपने नांदेडमध्ये केवळ फोडाफोडीचे राजकारण केले. त्याचा फटका त्यांना बसला नांदेडमध्ये बाहेरच्या लोकांना आणून निवडणूक लढवण्याचा जो प्रयत्न झाला, त्याचा फटका पराभूत पक्षाला बसला आहे. नांदेडवासियांनी माझ्यावर, माझ्या पक्षावर विश्वास टाकला आहे.'