Sat, Jul 04, 2020 03:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › क्रिकेट आणि राजकारणात काहीही शक्य, गडकरींचे सूचक वक्तव्य

क्रिकेट आणि राजकारणात काहीही शक्य, गडकरींचे सूचक वक्तव्य

Last Updated: Nov 15 2019 1:28AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसंदर्भात मोठे विधान केले आहे. गडकरी म्हणाले की, क्रिकेट आणि राजकारणात काहीही शक्य आहे. कधीकधी आपल्याला असे वाटते की आपण सामना गमावत आहोत, पण निकाल काहीतरी वेगळाच लागतो. 

ते म्हणाले की, मी नुकताच दिल्लीहून आलो आहे, त्यामुळे सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींविषयी मला पूर्ण माहिती नाही, असे म्हणत राजकीय प्रश्नांवर पडदा टाकला.

महाराष्ट्रात बिगर भाजपाचे सरकार स्थापन झाले तर मुंबईत सुरू असलेल्या प्रकल्पांचे काय होईल? असा सवाल या कार्यक्रमावेळी गडकरींना विचारला गेला तेव्हा या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, सरकार बदलते, पण प्रकल्प सुरूच असतात. मला यात कोणतीही अडचण वाटत नाही. सरकार कोणाचेही का स्थापन होऊदे आम्ही आम्ही सरकारच्या सकारात्मक धोरणांना पाठिंबा देऊ.