होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'अमित शहांनी माफी मागितल्यास निम्म्या अडचणी कमी होतील'

'अमित शहांनी माफी मागितल्यास निम्म्या अडचणी कमी होतील'

Last Updated: Feb 26 2020 2:36PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

राजधानी दिल्लीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून उसळलेल्या भीषण हिंसाचारात आतापर्यंत २१ जणांचा बळी गेला आहे. या हिंसाचारावरून बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहांवर घणाघाती प्रहार केला आहे. 

अधिक वाचा : 'शाहीन बाग मध्यस्थांच्या अहवालात 'जर आणि पण' याचाच अधिक भरणा'

ते म्हणाले की, 'गृहमंत्र्यांनी जर माफी मागितली, तर निम्म्या अडचणी तशाच सुटतील'. अनुराग कश्यप तापसी पन्नूच्या थप्पड या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचलो होता. दरम्यान, त्याला दिल्लीतील हिंसाचाराबद्दल प्रश्न विचारले गेले. यावर तो म्हणाले की, 'जगातील आपल्या निम्मी अडचणी कमी होतील, जर माफी मागितली तर. 

अधिक वाचा : दिल्ली हिंसाचार; गुप्तचर खात्याच्या अधिकाऱ्याचा मृतदेह नाल्यात सापडला 

त्याने आपवरही प्रहार करताना आप पक्षाने विवेक विकला आहे का? अशी विचारणा केली. अनुराग कश्यपने हिंसाचाराबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही लक्ष्य केले. केजरीवाल यांना टोला लगावत त्याने ट्विट केले की, "आम आदमी पार्टीने दिल्ली निवडणूक जिंकली होती ना?" अरविंद केजरीवाल आणि त्यांचे आपले आता कुठे आहेत? तुमची दिल्ली पेटली आहे. अमित शाह यांनी 'आप' विकत घेतला आहे की स्वतःच विवेक विकून टाकला आहे? 

अधिक वाचा : 'दिल्लीतील हिंसाचार पूर्वनियोजित कट; ७२ तास जाणीवपूर्वक कारवाई केली नाही'

इतकेच नाही तर अनुराग कश्यपने दुसर्‍या ट्विटमध्ये केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आणि दिल्लीतील हिंसाचारावर नियंत्रण न ठेवल्याने चांगलेच फटकारले. त्यांनी "लाज वाटालया हवी… अरविंद केजरीवाल" असे ट्विट केले. दिल्लीतील बर्‍याच भागात सुरू असलेल्या हिंसाचारात मृतांचा आकडा २१ वर गेला आहे. अजूनही काही भागात तणाव कायम आहे. दरम्यान, एनएसए अजित डोभाल यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

अधिक वाचा : दिल्ली हिंसाचार; गुप्तचर खात्याच्या अधिकाऱ्याचा मृतदेह नाल्यात सापडला