Tue, Oct 23, 2018 17:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपचे धोरण इलेक्शन फस्ट, नंतर नेशनः आदित्य ठाकरे

भाजपचे धोरण इलेक्शन फस्ट, नंतर नेशनः आदित्य ठाकरे

Published On: Dec 07 2017 7:42PM | Last Updated: Dec 07 2017 7:47PM

बुकमार्क करा

मुंबईः पुढारी ऑनलाईन

जीएसटीमध्ये सुधारणा यापूर्वी केल्या नाहीत, एका पक्षाला निवडणुकीत त्रास होईल असं दिसायला लागलं म्हणून आता सुधारणा केल्या. नेशन फस्ट नाही तर आता त्यांच्यासाठी इलेक्शन फस्ट झालं आहे. कदाचित नेशन फस्ट कॅम्पेनिंगचा चा मुखवटा फाटला, असे ट्विट करत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

राज्यात सत्तेवर असलेल्या युतीमध्ये दररोज धुसपुस सुरूच आहे. महाबळेश्वरला विश्रांतीसाठी येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करुन जाहीर सभांमध्ये भाजपवर जोरदार टीका केली होती. त्या दरम्यान याच दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या टीकांना प्रत्युत्तर न देता, त्यांच्याकडे आपण लक्ष देत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले होते. आता गुजराच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेही सक्रिय झाल्याचे दिसत आहे.