Sun, Jul 05, 2020 12:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ५६ रुग्ण पॉझिटिव्ह

पालघर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ५६ रुग्ण पॉझिटिव्ह

Last Updated: Jun 04 2020 10:46PM

file photoपालघर : पुढारी वृत्तसेवा

पालघर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 56 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. पालघर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1059 असून त्यापैकी 603 रुग्णांवर उपचार सुरू, तर 421 कोरोनामुक्‍त झाले आहेत. आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 6931 रुग्णांच्या घशातील स्वॅब नमुने घेण्यात आले असून त्यापैकी 1059 पॉझिटिव्ह, 5234 निगेटिव्ह, तर 638 जणांचे अहवाल अद्याप प्राप्‍त झालेली नाहीत. 
पालघरच्या ग्रामीण भागात 5 नवीन रुग्ण आढळले असून उर्वरित 51 रुग्ण वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. पालघरच्या ग्रामीण भागात एकूण रुग्णसंख्या 129 वर जावून पोहोचली आहे. यात पालघर तालुक्यातील दातिवरे येथील एक 12 वर्षीय, तर एका 6 वर्षीय मुलीचा समावेश आहे. ही दोन्ही मुले रुग्ण क्रमांक 97 च्या संपर्कात आली होती.  

पालघर जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या : पालघर - 54 (तिघांचा मृत्यू), डहाणू - 24, जव्हार - 2, वाडा - 6, वसई ग्रामीण - 46 (एकाचा मृत्यू) विक्रमगड - 1, वसई विरार महानगरपालिका - 929 (31 जणांचा मृत्यू)

पॉझिटिव्ह रुग्ण, पालघर ग्रामीण : एकूण रुग्णसंख्या 130

मृत्यू - 1, कोरोनामुक्‍त 64, सध्या उपचार घेत असलेले 62, पालघर ग्रामीण रुग्णालय 8, एसटीएच डहाणू 6, टीमा 18, रिद्धिविनायक 1, थुंगा 1, नायर 2, गोल्डन पार्क 5, ओएनजीसी 1, विनायका 1, जीजी कॉलेज वसई 3, साईबाबा हाउसिंग सोसायटी पालघर 13, बीएमसी कॉरंटाईन सेंटर 1, केईएम 1, स्टार हॉस्पिटल 1.