Sun, Jul 05, 2020 11:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण डोंबिवलीत नव्याने ४७ रुग्णाची भर 

कल्याण डोंबिवलीत नव्याने ४७ रुग्णाची भर 

Last Updated: Jun 04 2020 8:19PM

संग्रहित छायाचित्रकल्याण : पुढारी वृत्तसेवा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मागील २४ तासांत ४७ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने कोरोना रुग्णाची ऐकून संख्या १२७६ वर पोहोचली आहे. काल १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने बरे झालेल्या रुग्णाचा आकडा ५९५ इतका झाला आहे. तर ६४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मागील २४  तासांत पुन्हा नव्याने ४७ रुग्णांची भर पडल्याने कोरोना बाधितांची संख्या १२७६ वर गेली आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना डिस्चार्ज होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. काल दिवसभरात १५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने आजपर्यंत ५९५ रुग्ण कोरोनावर मात करत घरी परतले आहेत. उर्वरित  ६४६ रुग्णावर उपचार सुरू असून यामधील सुमारे ८० टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

दरम्यान पालिका क्षेत्रात आतापर्यत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील २०, कल्याण पश्चिमेतील ६, डोंबिवली पूर्वेतील ९, डोंबिवली पश्चिमेतील ७ तर टिटवाळा येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये  २० पुरुष, २२ महिला आणि ५ मुलं आहेत. 

आज सापडलेले रुग्ण कल्याण पूर्वेतील चक्कीनाका, पिसवली, जाईबाई विद्या मंदिराजवळ, लोकग्राम, नांदीवली, कर्पेवाडी, हाजी मलंग रोड, पुना लिंक रोड, शिवाजी कॉलनी रोड, आनंदवाडी, कल्याण पश्चिमेतील रोहिदास वाडा, खडकपाडा सर्कल, बेतूरकर पाडा, दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ टिळक चौक, शिवाजी चौक परिसर, रौनक सिटी फेज २, डोंबिवली पूर्वेतील अयोध्या नगरी, नवीन आयरे रोड, आजदे गाव, गोग्रासवाडी, आयरे रोड, डोंबिवली पश्चिमेतील दिन दयाल क्रॉस रोड, एम.पी. रोड, गरीबाचा वाडा, कुंभारखान पाडा,  महात्मा फुले रोड,  सुभाष रोड, टिटवाळा येथील सांगोडा रोड मांडा, गणेश विद्यालयाजवळ मांडा, माता मंदिर रोड आदी परिसरातील आहेत.