Sun, Jul 05, 2020 11:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केडीएमसीत नव्याने ३८ रुग्णांची भर, एकाचा मृत्यू 

केडीएमसीत नव्याने ३८ रुग्णांची भर, एकाचा मृत्यू 

Last Updated: May 30 2020 6:45PM

संग्रहित छायाचित्रकल्याण : पुढारी वृत्तसेवा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आज पुन्हा नव्याने ३८ रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या हजारच्या उंबरठ्यावर म्हणजे ९८० पर्यंत पोहोचली आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना मृतांचा आकडा वाढत असून काल नेतीवली येथील ४६ वर्षीय इसमाचा मृत्यू पश्चात अहवाल पोझिटिव्ह आल्याने कोरोनामुळे मृतांचा आकडा २८ वर गेला आहे. तर काल दिवसभरात ८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  त्यामुळे एकूण ३३४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर ६१८ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत .

वाचा : आघाडी सरकारला ६ महिने पूर्ण, पण ४३ मंत्र्यांचे पीएस, ओएसडी, पीए यांनी व्यक्त केली 'ही' खंत!  

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असताना आरोग्य विभागात कार्यरत असणारे कर्मचारी देखील बाधित होत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आज नव्याने पुन्हा ३८  रुग्णांची भर पडली असून, एकूण रुग्णसंख्या ९८० पर्यंत पोहोचली आहे. आज आढळलेल्या रुग्णामध्ये कल्याण पूर्वेत सर्वाधिक २८ रुग्ण सापडले यामध्ये करपेवाडी व चिंचपाडा प्रत्येकी सात तर लशेवाडी ४, काटे मानवली ३ व विठ्ठलवाडी, नेतेवली, परशुरामवाडी परिसरात प्रत्येकी एक असे रुग्ण सापडले. 

कल्यान पश्चिम मध्ये जोशी बाग ३ व आंबेडकर रोड आणि आनंद नगर परिसरातील प्रत्येकी एक असे ५ रुग्ण सापडले. डोंबिवली पूर्व परिसरात तुकाराम नगर ५, आजदे ३ व मानपाडा १ असे नऊ रुग्ण सापडले. यामध्ये पुरुष २२ व स्त्रिया १६ रुगणाचा समावेश आहे. असे पालिका क्षेत्रात एकूण ३८ रुग्ण आढळले आहेत. तर कल्याण पूर्व नेतीवली येथील ४६ वर्षीय रुग्णाचा शास्त्री नगर येथे उपचार सुरू होते. २८ तारखेला मृत्यूूू झाला होता. मृत्यू पश्चात त्याचा अहवाल कोरोना पोझिटिव्ह आल्याने मृतांचा आकडा २८ वर पोहचला आहे. काल दिवसभरात आठ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने आजमितीला एकूण ३३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे .

वाचा : विरोधी पक्ष नेत्यांनी घेतला केइएम रुग्णालयाचा आढावा