Sun, May 31, 2020 20:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मॅनहोल्स, समुद्रात बुडून ६ वर्षांत ३४० जणांचा बळी

मॅनहोल्स, समुद्रात बुडून ६ वर्षांत ३४० जणांचा बळी

Published On: Jul 12 2019 1:53AM | Last Updated: Jul 12 2019 1:53AM
मुंबई : प्रतिनिधी 

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहराची ओळख आता दुर्घटनांचे शहर म्हणून बनू पाहत आहे. एकीकडे शहरात जगणे महाग झाले असतानाच मृत्यू मात्र स्वस्त झाला आहे. गेल्या 6 वर्षाच्या काळात मुंबईत रस्त्यावरील मॅन्सहोल, गटारे आणि समुद्रात बुडण्याच्या सुमारे 645 दुर्घटना घडल्या. यात 340 निष्पाप मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. 

यासंदर्भात महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाचे जनमाहिती अधिकारी आणि सहाय्यक अभियंता सुनील जाधव यांनी माहिती दिली. या घटनांमध्ये पालिकेचा निष्काळजीपणा दिसून येत आहे, असे एका आरटीआय कार्यकर्त्याने पालिका व अग्निशमन दलाला पत्र पाठवून अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.