Tue, Dec 10, 2019 13:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू 

ठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू 

Published On: Jul 22 2019 1:54PM | Last Updated: Jul 22 2019 1:54PM

संग्रहित छायाचित्रठाणे : पुढारी ऑनलाईन

धावत्या लोकलमधून पडून एका तरूणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. सविता नाईक (वय-३०) असे या तरूणीचे नाव आहे. कोपर-दिवा स्थानकादरम्यान ही घटना घडली. मुंबई, ठाणे लोकलमधील वाढत्या गर्दीने आज आणखी एकाचा बळी गेला. या दुर्घटनेनंतर जीआरपीएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. 

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीहून सुटलेल्या सीएसएमटी फास्ट लोकलमधून सविता प्रवास करीत होत्या. या लोकलमध्ये गर्दी होती. या गर्दीच्या धकाधकीत कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान सविता लोकलमधून खाली पडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. 

काही दिवसांपूर्वी गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये प्रवेश न मिळाल्याने दरवाजाला लटकून प्रवास करणाऱ्या रविकांत भगवान चाळकर (45) यांचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. रविकांत चाकळर हे पलावासीटी, काटई, डोंबिवली (पूर्व) येथील रहिवासी होते.  तर मोबाइल चोराचा पाठलाग करताना लोकलमधून पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना ही रविवारी (8 जुलै) समोर आली होती. पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नी रोड स्टेशनवर ही घटना घडली होती. लोकलमधून पडून अशा पध्दतीने मृत्यू झालेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.