Sun, May 31, 2020 12:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रातील धाकट्‍या पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी भक्तांची गर्दी (video)

धाकट्‍या पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी भक्तांची गर्दी (video)

Published On: Jul 12 2019 11:47AM | Last Updated: Jul 12 2019 12:52PM
खोपोली :  प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील धाकटी पंढरी म्हणून रायगड जिल्ह्यातील खालापुरातील साजगाव ताकई येथील बोबल्या विठोबा मंदिराची ओळख आहे. आज या ठिकाणी (ता.१२) विठ्ठल दर्शनासाठी भक्‍तांनी गर्दी केली आहे.  

ज्या भक्तांना पंढरीची वारी करता नाही असे भक्त या धाकट्या पंढरीत जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीच्याया निमित्ताने पाहटे चार वाजता ॲड. सचिन पाटील यांच्‍या कुटुंबाला धाकट्या पंढरीत महापूजेचा मान मिळाला आहे. पूजा झाल्यानंतर भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आल्याने भक्तांनी धाकट्या पंढरीत दर्शनासाठी रीघ लावली. तसेच ग्रामीण भागातून पायी दिंड्या ही दाखल झाल्याने विठू नामाचा गजर दिवसभर रंगणार आहे. दर्शनासाठी देवस्थान कमिटी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहेत. या ठिकाणी हार तुऱ्यासह मिठाईची दुकाने ही सजली आहेत. भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.