Sat, Aug 24, 2019 10:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण द्या : शिवसेना

'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'

Published On: Nov 19 2018 2:11PM | Last Updated: Nov 19 2018 2:32PMमुंबई : प्रतिनिधी

मराठा समाजाला न्यायालयात टिकेल असे आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्या, अशी मागणी करत शिवसेना आमदारांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबई विधानभवन येथे  शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदिप नरके, सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील यांनी मराठा आरक्षणाची घोषणाबाजी नको तर न्यायालयात टिकेल अस आरक्षण द्या, अशी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवनात प्रवेश केला. शासनाने निव्वळ खोट्या घोषणा व वेळ न देता  त्वरित मराठा समाजाला  आरक्षण द्यावे. अन्यथा आता मराठा समाज गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.