Tue, Oct 23, 2018 16:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बसची वाट पाहणार्‍या महिलेचा चेंबूरमध्ये झाड कोसळून मृत्यू

बसची वाट पाहणार्‍या महिलेचा चेंबूरमध्ये झाड कोसळून मृत्यू

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 08 2017 1:26AM

बुकमार्क करा

मुंबई : वार्ताहर

चेंबूरमध्ये जुलै महिन्यात नारळाचे झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बस स्टॉपवर बसची वाट पाहत बसलेल्या शारदा सहदेव घोडेस्वार (45) यांच्या अंगावर झाड कोसळून गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता मृत्यू झाला. चेंबूर परिसरात गेल्या पाच महिन्यात अंगावर झाड कोसळून तिघांचा बळी गेला आहे.

पालिका प्रशासन आपली जबाबदारी ढकलत असून रस्त्यावरून चालणेही  धोकादायक झाले असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया चेंबूरकर व्यक्‍त करत आहेत.पांजरापोळ परिसरातील गौतमनगरात राहणार्‍या शारदा घोडेस्वार या  चेंबूरच्या डायमंड गार्डन परिसरातील इमारतीत घरकाम करायच्या. काम उरकून डायमंड गार्डन ते स्वातंत्र सैनिक गार्डन दरम्यानच्या  बस स्टॉपवर त्या बसल्या होत्या. त्यावेळी रस्त्यालगतचे जुने झाड अचानक कोसळले. यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या. नागरिकांनी त्यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.