Wed, Jun 03, 2020 09:48होमपेज › Marathwada › बीड : परतीच्या पावसाने उद्याचे टेन्शन वाढले!

बीड : परतीच्या पावसाने उद्याचे टेन्शन वाढले!

Last Updated: Oct 20 2019 2:39PM

संग्रहित छायाचित्रटाकरवण (बीड) : प्रतिनिधी

परतीचा पाऊस शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी घेऊन आला आहे. मात्र, या पावसाने निवडणूक कर्मचारी तसेच उमेदवारांची झोप उडाली आहे. या पावसामुळे मतदानाचा टक्का वाढणार की घटणार? याची चिंता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

निवडणूक मोकळ्या वातावरणात पार पाडाव्या या नुसार मतदानाची तारीख काढण्यात आली होती. मात्र मागील पंधरवड्यापासून उघडलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने अनेकांची अडचण वाढवणारा आहे.  या पावसाचा सर्वाधिक परिणाम हा निवडणूक प्रशासनावर होणार आहे.

निवडणूक साहित्याचे वाटप बसची पार्किंग कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक निवास व्यवस्था साहित्य जमा करणे आदी बाबी पावसात करताना निवडणूक प्रशासनावर मोठा ताण पडणार असल्याचे बोलले जात आहे. त्याशिवाय गळणारे मतदान बुथ हे देखील प्रशासनाची चिंता वाढविण्यात भर टाकत आहे.

मतदानाच्या दिवसात पाऊस आल्याने शेतीची कामे तत्पुरतेने थांबली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह मजूर वर्ग मतदानाच्या दिवशी घरीच राहणार असल्याने मतदानाचा टक्का वाढेल असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी जर सारखा पाऊस सुरू राहिला तर मतदार घराबाहेर निघण्यास कंटाळा करतील अशी चिंता आहे .अनेकांमधून वर्तवली जात आहे. परंतु अचानक आलेल्या पावसाने टाकरवनसह परिसरात थोडी खुशी थोडा गमचे वातावरण तयार झाल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.