Sun, Oct 20, 2019 17:09होमपेज › Marathwada › राष्ट्रवादी म्हणजे शेण खाणाऱ्यांची अवलाद : उद्धव ठाकरे

लाज वाटते का ? विचारायला लाज कशी वाटत नाही? : उद्धव ठाकरे

Published On: Apr 15 2019 8:48PM | Last Updated: Apr 15 2019 8:48PM
परभणी : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर जोरदार प्रतिहल्ला केला. शेतकऱ्यांबाबत मी जी भूमिका मांडली ते भाजपने ऐकली. मग युती का करू नको? शरद पवारांना टीका करायला काय जातंय? ते मला सांगत आहेत की मी टीका केली. मला योग्य वाटलं ते मी बोललो. मला तुम्ही शिकवू नका. राष्ट्रवादीसारखी शेण खाणारी अवलाद आमची नाही, अशा शब्दांत उद्धव यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. 

उद्धव पुढे म्हणाले, देशाला नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधानच पाहिजे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसने 'लाज वाटते का?' अशी प्रचार मोहीम सुरू केली आहे. हा प्रश्न विद्यमान सरकारला विचारला जातोय. या घोषणेचा उद्धव यांनी तिखट शब्दांत समाचार घेतला. हा प्रश्न विचारायला राष्ट्रवादी वाल्यांना लाज कशी वाटत नाही? असा प्रश्न उद्धव यांनी केला. तसेच राहुल गांधींच्या पक्षात घोटाळेबाज तर राष्ट्रवादीत दरोडेखोर आहेत, असा आरोपही उद्धव यांनी केला.