Sun, Oct 20, 2019 17:35होमपेज › Marathwada › टाईपरायटींगचा पेपर अवघड गेल्याने आत्महत्या 

टाईपरायटींगचा पेपर अवघड गेल्याने आत्महत्या 

Published On: Jul 31 2019 4:22PM | Last Updated: Jul 31 2019 4:12PM
वसमत : प्रतिनिधी

टाईपरायटींग परीक्षेचा पेपर अवघड गेल्याच्या नैराश्यातून वसमत शहरातील एका (22 वर्षीय) विद्यार्थ्यांने घरातील छताच्या झोका बांधायच्या गजाला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही दुर्देवी घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. 

या विषयी अधिक माहिती अशी की, शहरातील ब्राम्हणगल्ली भागात राहणार्‍या आकाश सुरेशराव वाघमारे याने (दि. 29) जुलै रोजी शहरातील बहिर्जी विद्यालयात टाईपरायटींगची परीक्षा दिली होती. परंतू आकाशला पेपर अवघड गेल्याने तो तणावात होता. यातून आलेल्‍या नैराश्यातून आकाशने मंगळवार (दि.३०) दुपारी आपल्या राहत्या घरी छताला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी साईनाथ सुरेश वाघमारे यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात बुधवारी आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.