Sun, Jun 07, 2020 15:31होमपेज › Marathwada › कुऱ्हाडी शिवारात तलावात बुडून दोघांचा मृत्यू

कुऱ्हाडी शिवारात तलावात बुडून दोघांचा मृत्यू

Published On: Apr 25 2019 8:58PM | Last Updated: Apr 25 2019 8:58PM
जिंतूर : प्रतिनिधी 

तालुक्यातील कुऱ्हाडी शिवारात असलेल्या तलावात पोहण्याकरिता गेलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही हृदय पिळवटून टाकणारी  घटना बुधवार दि. 24 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे कटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

सदरील हृदय पिळवटून टाकणार्‍या घटनेविषयी अधिक वृत्त असे की, जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी येथे इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या आठ वर्षीय करण सुभाष निकाळजे व मामाच्या गावात सुट्ट्यांमध्ये आलेला मंठा येथील 14 वर्षीय पवन दिलीप आढे हे दोन विद्यार्थी कुऱ्हाडी शिवारातील तलावात पोहण्याकरिता गेले होते. मात्र पोहताना दोघांचे पाय गाळात अडकल्याने दोघांचाही पाण्यात बुडून करून अंत झाला. 

सदरील घटना शेळी पालन करणाऱ्या मुलीने ग्रामस्थांना सांगितल्यानंतर नारायण इंझे, राम काजळे, दामोदर घुगे, लक्ष्मण काजळे, केशव इंझे, केशव इंझे आदींच्या मदत कार्याने दोघांचे प्रेत बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बामणी पोलिस ठाण्याचे पो उप नी पल्लेवाड, जमादार मेकेवाड यांनी घटनेचा पंचनामा केला.