Thu, Oct 17, 2019 13:13होमपेज › Marathwada › हिंगोली : इंडिका कार झाडाला धडकून दोन ठार

हिंगोली : इंडिका कार झाडाला धडकून दोन ठार

Published On: May 05 2019 6:57PM | Last Updated: May 05 2019 6:58PM
हिंगोली : प्रतिनिधी

वाशिम जिल्ह्यातील विवाह सोहळा आटोपून हिंगोलीकडे परतणार्‍या मुस्लीम बांधवांच्या इंडिका कारचा झाडावर आदळून भीषण अपघात झाला. यामध्ये एका वृद्ध व्यक्‍तीसह दहा वर्षाचा मुलगा जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (दि.5) दुपारी 2 च्या सुमारास घडली.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील माळेगाव येथील खान कुटूंब वाशिम जिल्ह्यातील वारे येथे लग्‍न    सोहळ्याकरिता गेले होते. लग्‍न सोहळा आटोपून हिंगोलीकडे परतत असतांना कनेरगाव नाका नजीक असलेल्या चिंचाळा पाटीजवळ भरधाव वेगातील इंडिका कार क्रमांक एमएच 29 एआर 1052 ने झाडाला धडक दिली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. यामध्ये मुक्‍तार खान गफार खान (वय 60) व अबुजर गफार खान (वय 10) या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इंडिका चालक अख्तर खान (वय 40), शेख वसीम (वय 22), नजीमाबी असद खान (वय 50) व अन्य एक असे चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराकरिता तातडीने नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.