Mon, Jun 01, 2020 19:31
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › दोन दुचाकींच्या धडकेत १ ठार, ३ गंभीर 

दोन दुचाकींच्या धडकेत १ ठार, ३ गंभीर 

Published On: Apr 09 2018 8:58PM | Last Updated: Apr 09 2018 8:58PMसेलू : प्रतिनिधी

सेलू-पाथरी महामार्गावरील सिमूर गव्हाण पाटीजवळ सोमवारी (ता.९) सायंकाळी सहाच्या सुमारास दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून तिनजण गंभीर जखमी झाले आहेत. 

सविस्तर वृत्त असे, तालुक्यातील डासाळा येथील मदन  गिराम (वय ६०) व त्यांचा मुलगा मुक्तीराम गिराम (वय २६) हे बाप-लेक आपल्या दुचाकीवरून डासाळा येथून पाथरीकडे जात असताना, पाथरीकडून कवडधन येथे येत असलेले अशोक रूपाजी थोरात ( वय ४०) व आण्णा मारूती कांबळे ( वय २६) यांच्या दुचाकीची सिमूर गव्हाण पाटीजवळ समोरासमोर धडक झाली. यात मदन  गिराम ( वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला तर मुक्तीराम गिराम यांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातातील जखमी अशोक थोरात, आण्णा कांबळे व मुक्तीराम गिराम यांना उपचारासाठी परभणी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.