Fri, Jun 21, 2019 00:34होमपेज › Marathwada › कोल्हापुरातील अट्टल घरफोड्यांना लातूर पोलिसांच्या बेड्या

कोल्हापुरातील अट्टल घरफोड्यांना लातूर पोलिसांच्या बेड्या

Published On: Dec 20 2017 9:40PM | Last Updated: Dec 20 2017 9:40PM

बुकमार्क करा

प्रतिनिधी : लातूर

घरफोड्या करुन पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कोल्हापूरातील दोन अट्टल घरफोड्यांना लातूर स्थानिक गुन्हे अन्वेशनच्या पथकाने कोल्हापुरात जेरबंद केले. कैस अब्बास शेख (रा. आर. के. नगर)  व यासीन मौला बागवान ( रा. लक्ष्मण तीर्थ वस्ती) अशी अटक करण्यात आलेल्‍या संशयित चोरट्यांची नावे आहेत. त्यांना चौकशीसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या दोन्ही आरोपींवर अनेक घरफोडी प्रकरणी कोल्हापुरातील करवीर नगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. कैस अब्बास शेख हा लातुरचा जावई आहे. तो दिवसाढवळ्ल्या घरफोडी करतो. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटना वाढल्याने पोलिस आणि नागरीक भयभीत झले होते. चोरट्यांना जेरबंद करणे हे त्यांच्यासाठी आवाहन ठरले होते. कैस हा त्याच्या सासरवाडीस येतो अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी झाली होती. त्यामुळे त्या दिवशी कैस लातुरात होता का याची चौकशी पोलिसांनी केली असता तो आला असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यावरुन करवीरनगर पोलिसांशी त्यांनी संपर्क साधून त्याची माहिती मिळवली होती. त्यानंतर लातुरहून बालाजी सोनटक्के , एपीआय भालेराव यांचे पथक कोल्हापूरला रवाना झाले. तेथे कैसच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी त्यास जेरबंद केले व त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन त्याचा साथीदार यासीनलाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून अनेक मोबाईल व दागीने असा मोठा ऐवज जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी सांगितले.