Thu, Jun 04, 2020 13:45होमपेज › Marathwada › लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता 

लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता 

Published On: Apr 10 2019 8:21PM | Last Updated: Apr 10 2019 7:44PM
लातूर प्रतिनिधी 

मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद ,बीड जिल्ह्यातील काही भागात ११ व १२ एप्रिल रोजी वादळी पाऊस होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली असून या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील महसूल व आपत्ती नियंत्रण कक्षाला सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

११ व १२ एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस तसेच गारपीटही होऊ शकते. विजेचा कडकडाट सुरू असताना घराबाहेर पडू नये. झाडाखाली थांबू नये. गुरांना झाडा नजीक, झाडाखाली, विद्युत खांब व पाण्याच्या स्त्रोताजवळ बांधू नये. कापणी केलेले पीक तसेच धान्य सुरक्षित ठिकाणी हलवावे. वादळ व गारपीटीत विजेच्या तारा तुटण्याची शक्यता असते त्यामुळे तारा खाली थांबू नये, असे प्रशासनाने कळविले आहे. दरम्यान संबंधित यंत्रणेने गावकऱ्यांना तातडीने सावधगिरीच्या सूचना द्याव्यात व या कालावधीत मुख्यालय सोडू नये असे आदेश जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिले आहेत.