Thu, Jun 04, 2020 13:13होमपेज › Marathwada › सात लाखांची लाच, समाज कल्याण अधिकाऱ्यांसह शिक्षण संस्थेच्या सचिवावर गुन्हा

सात लाखांची लाच, समाज कल्याण अधिकाऱ्यांसह शिक्षण संस्थेच्या सचिवावर गुन्हा

Published On: Jul 23 2019 11:53PM | Last Updated: Jul 23 2019 11:53PM
लातूर : प्रतिनिधी

थकित वेतनाचे बिल काढलेल्या कामाचे बक्षीस म्हणून समाज कल्याण अधिकाऱ्यासाठी सात लाखाची लाच स्वीकारणार्‍या एका शिक्षण संस्थेच्या सचिवास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले. उमाकांत नरसिंग तपशाळे असे त्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
 
तक्रारदार हा एका शाळेत कर्मचारी आहे त्याचे ४७ लाख ३३ हजार ६८९ रुपयाचे थकीत बिल काढण्यात आले होते. या कामाचे बक्षीस म्हणून लातूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी मिनीगिरे यांनी तपशाळे यांच्या मध्यस्थीने तक्रारदाराकडे बिलाच्या २० टक्के रक्कम म्हणजेच ९ लाख ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती सात लाख पहिल्या टप्प्यात व २ लाख ४० हजार दुसऱ्या टप्प्यात घेण्याचे समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगीरे यांनी मान्य केले होते. याबाबत संबंधित कर्मचाऱ्याने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. 

त्यानुसार मंगळवारी पोलिस अधीक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद जवळ असलेल्या एका हॉटेलात सापळा लावण्यात आला होता. तेथे ही लाच स्वीकारताना तपशाळेत पकडला गेला. तर मीनगिरे यांनी लाच मागितल्याचे   सिद्ध झाले.