Fri, May 29, 2020 02:56होमपेज › Marathwada › कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Published On: Apr 21 2018 4:32PM | Last Updated: Apr 21 2018 4:32PMकलमनुरी (हिंगोली) : वार्ताहर

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील 33 वर्षीय शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली. सिंदगी येथील शेतकरी आत्महत्येची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे.

गजानन तुकाराम मगर (वय 33) या शेतकऱ्याने आज (शनिवार दि.21) सकाळच्या सुमारास आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

गजानन मगर या शेतकऱ्यास दीड एकर कोरडवाहू जमीन असून सततच्या नापिकीमुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते. बँकेचे एक लाख रुपयाचे कर्जदेखील त्यांच्याकडे होते. सततच्या नापिकीमुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. दरम्यान आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या शेतातील झाडास गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी चार मुली असा परिवार आहे. सिंदगी येथे आठ दिवसांपूर्वी बालाजी मगर या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती आठवड्यात ही दुसरी आत्महत्या असल्याने गावावर शोककळा पसरली.

Tags : sindagi, farmer suicide, hingoli, marathawada news