Sun, Jun 07, 2020 09:02होमपेज › Marathwada › छत्रपती शिवाजी महाराजांची विश्‍वविक्रमी रांगोळी तुम्ही पाहिली का? (व्हिडिओ)

छत्रपती शिवाजी महाराजांची विश्‍वविक्रमी रांगोळी तुम्ही पाहिली का? (व्हिडिओ)

Published On: Feb 18 2018 1:59AM | Last Updated: Feb 18 2018 2:59PMलातूर : प्रतिनिधी

लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर साकारण्यात आलेली अडीच एकरांवरील छत्रपती शिवाजी महाराजांची विश्‍वविक्रमी रांगोळी पूर्ण झाली असून ती नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आलेली आहे.

ही विश्‍वविक्रमी रांगोळी पाहण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी क्रीडा संकुलाच्या मैदानावर यावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. लातूरचा नावलौकिक जगभरात व्हावा, याकरिता शिवमहोत्सव समिती व अक्‍का फाऊंडेशन यांच्या पुढाकारातून जगातील सर्वात मोठ्या रांगोळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारण्याचे ठरवलेले होते. मंगेश निपाणीकर व त्यांच्या चमूने काही दिवसांपूर्वी रांगोळी रेखाटन सुरू केले होते. तब्बल 50 हजार किलो विविध रंगांच्या रांगोळीचा वापर करून 72 तासांच्या अथक परिश्रमानंतर ही रांगोळी पूर्ण झालेली आहे.

 

यापूर्वी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 10 हजार चौरस फूट जागेवर रांगोळी साकारण्यात आल्याचा विक्रम नोंद झालेला आहे. मात्र, क्रीडा संकुलाच्या मैदानावर साकारण्यात आलेली ही रांगोळी तब्बल अडीच एकर म्हणजेच एक लाख चौरसफूट जागेत साकारण्यात आलेली आहे. या रांगोळीची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद व्हावी, याकरिता सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले निकषही पाळण्यात आलेले असून या रांगोळीची नोंद निश्‍चितच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होईल, असा विश्‍वास शिवमहोत्सव समिती व अक्‍का फाऊंडेशनच्या वतीने व्यक्‍त करण्यात आला आहे.