Sun, Jun 07, 2020 07:22होमपेज › Marathwada › नराधम शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार  

नराधम शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार  

Published On: Jan 28 2019 7:46PM | Last Updated: Jan 28 2019 7:46PM
लातूर : प्रतिनिधी 

गुरू-शिष्याच्या परंपरेला काळीमा फासणारी घटना पुन्हा एकदा राज्यात घडली आहे. ही संतापजनक घटना अहमदपूर तालुक्यात घडली असून एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे. याप्रकरणी किनगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नराधम शिक्षक गणेश बेंबडे याला पोलिसांनी अटक केली आहे. 

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी, नराधम शिक्षकाची पीडितेवर वाईट नजर होती. पीडिता ही दहावीच्या वर्गात शिकत असून ती खेळाडूही आहे. २४ जानेवारी रोजी आरोपी बेंबडे याने तिच्या वडीलांना तुमच्या मुलीचा सत्कार आहे, असे सांगून मुलीला बोलून घेतले होते. त्यानंतर तिला स्वतःच्या गाडीत चाकूर येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तर याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकाराने मुलीला मानसिक धक्का बसला होता. तणाव असह्य झाल्याने तिने कीटकनाशक पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर अहमदपूर येथील खासगी रुग्णालय उपचार सुरू आहेत. दरम्यान आरोपीला अहमदपुरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास १ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय गीते हे करीत आहेत.