Thu, Oct 17, 2019 13:05होमपेज › Marathwada › धनंजय मुंडेंच्या गणेशोत्‍सवात सपना चौधरीचे ठुमके! (Video)

धनंजय मुंडेंच्या गणेशोत्‍सवात सपना चौधरीचे ठुमके! (Video)

Published On: Sep 18 2018 6:09PM | Last Updated: Sep 18 2018 6:12PMबीड : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या 'नाथ प्रतिष्ठान परळी' ने आयोजित केलेल्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्साच्या कार्यक्रमात हरियाणाची नृत्यांगणा सपना चौधरीच्या बिभत्‍स ठुमक्यांवर राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह तरुणाई बेभान झाली. यावेळी बेभान तरुणाईला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या प्रकारानंतर लोकांनी घडल्या प्रकारावर नाराजी व्यक्‍त केली तर नेटक-यांनी सोशल मीडियावरून याची खिल्ली उडवली आहे. 

सपनाचा डान्स पाहण्यासाठी परळीकरांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे पोलिस तसेच खाजगी बाऊन्सर यांचा मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात केला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेही उपस्थित होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. काही तरुणांनी तर चक्क कार्यक्रमाच्या मंडपासाठी उभ्या केलेल्या खांबावर चढून जल्लोष केला. मात्र, या तरुणांच्या अति जल्लोषामुळे गोंधळाची परिस्थिती रोखण्यासाठी खुद्द धनंजय मुंडे यांना प्रेक्षकांना आवरणे कठीण होवून बसले. शेवटी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. 

धार्मिक गणेशोत्सवामध्ये अशा नृत्यांचे कार्यक्रम आयोजित करण्याची खरच गरज होती का ? असा प्रश्न लोकांमधून उपस्थित होत आहे. तसेच घडल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे.