Thu, Oct 17, 2019 06:30होमपेज › Marathwada › लातुरात भोंदूबाबाचा  महिलेवर बलात्कार

मंत्राद्वारे मूल होत असल्याचे सांगत अत्याचार

Published On: May 04 2019 1:42AM | Last Updated: May 03 2019 10:34PM
लातूर ः प्रतिनिधी

मंत्राद्वारे मूल होते असे भासवत येथील एका महिलेवर भोंदूबाबाने बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून भोंदूबाबावर  विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात बलात्कार तसेच जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

मोहम्मद पाशा शेख असे भोंदू बाबाचे नाव आहे. शहरातील एका 25 वर्षीय महिलेस मूल नव्हते. दरम्यान, ती लातूर तालुक्यातील बोरी येथील मोहम्मद शेख या भोंदूबाबाच्या संपर्कात आली. तिने त्यास समस्या सांगितली. त्याने तिला विश्‍वासात घेतले व आपल्याकडे या समस्येवर उपाय असल्याचे सांगितले. मंत्राद्वारे तुला मूल होईल, असा विश्‍वास त्याने  तिला दिला व तिनेही त्यावर विश्‍वास ठेवला. मग ती त्याच्याकडे जा-ये करू लागली. त्याने तिला लातूर, बिदर अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेले व तिथे तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे करत आहेत.