होमपेज › Marathwada › बीड : परळीतील दोन वारकरी महिलांचा अपघातामध्ये मृत्यू

बीड : परळीतील दोन वारकरी महिलांचा अपघातामध्ये मृत्यू

Published On: Jul 04 2018 2:56PM | Last Updated: Jul 04 2018 2:56PMपरळी वैजनाथ : प्रतिनिधी

मोशी येथे मुक्कामी असलेल्या दिंडीतील दोन वारकरी महिलांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. रस्ता ओलांडत असताना या महिलांना वाहनाने धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. जनाबाई साबळे (वय ५५) आणि सुमनबाई इंगोले (६०) अशी या मृतांची नावे आहेत. त्या परळी तालुक्यातील रहिवासी होत्या. आळंदीच्या दिंडीत सहभागी झालेल्या जनाबाई साबळे आणि सुमनबाई इंगोले या पंढरपूरला जाणार होत्या. मंगळवारी ही दिंडी मोशी येथे मुक्कामी होती.

बुधवारी पहाटे त्या दोघी प्रात:विधीला जात होत्या. धडक इतकी जोरदार होती की, दोघींचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला.