Mon, Jun 01, 2020 18:09
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › नळदुर्ग शहरात वादळी पावसात शेतकऱ्याचा मृत्यू

नळदुर्ग शहरात वादळी पावसात शेतकऱ्याचा मृत्यू

Published On: Jun 19 2019 8:20PM | Last Updated: Jun 19 2019 8:33PM
नळदुर्ग : प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. आज, बुधवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास नळदुर्ग शहर व परिसरास मृग नक्षत्रातील शेवटाच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. या वादळी वा-यात शेतातून बैल घेवून जात असणाऱ्या एका शेतक-याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  सेवा रेवा राठोड (वय-७०, रा. वसंतनगर, नळदुर्ग) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मैलारपूर शिवारात ही घटना घडली. मात्र मृत झालेल्या शेतकऱ्याचे नेमके कारण समजू शकले नाही. 

नळदुर्ग परिसरात आज, बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी मैलारपूर येथे शेतातून बैल घेवून राठोड हे घराकडे जात होते. याचवेळी त्याचा मृत्यू झाला. खेमा राठोड यांचा वादळी पावसात सापडूनच मृत्यू झाल्याचे भारत जाधव यांनी सांगितले. 

दरम्यान, दिवसभर उकाडयाने हैराण झालेल्या शहरवासियांना मात्र थोडा दिलासा मिळाला. जूनच्या पहिल्या आठवडयात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावल्यानंतर तब्बल दोन आठवडयानी पावसाने हजेरी लावली.