Wed, May 27, 2020 12:15होमपेज › Marathwada › बीड : कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर तासाभरात रुग्णाचा मृत्यू 

बीड : कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर तासाभरात रुग्णाचा मृत्यू 

Last Updated: May 22 2020 9:55AM

संग्रहीक छायाचित्रबीड : पुढारी वृत्तसेवा 

आष्टी तालुक्यातील एका वृद्ध रुग्णाचे रात्री कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर तासाभरात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. आता त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. हा रुग्ण बऱ्याच दिवसांपासून आजारी असून, त्यांस अनेक आजारांनी ग्रासले होते. 

वाचा :वाशिम : 'लॉकडाऊन'च्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी

यापुर्वी आष्टी, नगर येथे दवाखान्यात उपचार करण्यात आले. मात्र श्र्वास घेण्यास त्रास होत असल्याने बीड येथे आणण्यात आले. येथे आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले होते. रात्री ९ च्या सुमारास कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतला यानंतर तासाभरात सदरील रुग्णाचा मृत्यू झाला.

सदरील रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. तसेच तो कोरोनाबाधित रुग्णाच्या संर्पकात आलेला नाही खबरदारी म्हणून स्वॅब घेतल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.