होमपेज › Marathwada › पंढरपूर प्रवासी रेल्वेत चाकुहल्ला करणारा आरोपी जेरबंद...!

पंढरपूर प्रवासी रेल्वेत चाकुहल्ला करणारा आरोपी जेरबंद...!

Published On: Nov 15 2017 2:36AM | Last Updated: Nov 15 2017 2:36AM

बुकमार्क करा

परळी वैजनाथ : प्रतिनिधी

चालत्या  रेल्वेत एका प्रवाशावर चाकू हल्ला प्रकरणी आरोपी गंगाखेड पोलिसांनी जेरबंद केला असून या आरोपीला परळी रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
निजामबाद -पंढरपूर रेल्वेत गंगाखेड ते परळी दरम्यान दि.१२ रोजी रात्री चाकू हल्ल्याची घटना धावत्या रेल्वेत घडली होती. या प्रकरणी हनुमान रामभाऊ पवार व अन्य एक यांच्या विरोधात परळी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी गंगाखेडचे पोलिस निरीक्षक सोहन माछरे, फौजदार भाऊसाहेब मगरे, स. पो. उप. नि. मोइनोद्दीन पठाण, जमादार प्रकाश रेवले, भारत तावरे, बळीराम जाधव, नवनाथ मुंढे, राजकुमार बंडेवाड, बळीराम करवर यांच्या पथकाने  सापळा रचून या आरोपीला दिलकश चौक गंगाखेड  येथून जेरबंद करून परळी पोलिसांच्या ताब्यात दिले. परळी रेल्वे पोलिसचे एपीआय गोंडाने, पीएसआय हबीब खान, संजय भेंडेकर, मिराशे, राम चंदेल परळी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.

 रेल्वे पोलीस उपअधीक्षकांनी घेतला आढावा

दरम्यान या थरारक घटनेने  रेल्वेप्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेतील फरार आरोपी पकडण्याचे पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे होते. यासाठी घटनेनंतर रेल्वे पोलीस, राज्य पोलीस आरोपीचा शोध घेत होते. रेल्वे पोलिस उप अधीक्षक संजय सातव यांनी परळी येथे येऊन तपासाचा आढावा घेतला.