Sun, Jun 07, 2020 14:42होमपेज › Marathwada › समाजातील वंचितांशी माझे रक्ताचे नाते : पंकजा मुंडे

समाजातील वंचितांशी माझे रक्ताचे नाते : पंकजा मुंडे

Published On: Aug 13 2018 1:14AM | Last Updated: Aug 13 2018 1:14AMपरळी : प्रतिनिधी

समाजातील आणखी काही घटक वंचित आहेत, या वंचितांना आपण सर्वोतोपरी मदत करीत आहोत, त्यामुळे हीच वंचित माणसे आता आपली रक्ताची नाते झाल्याचे भावनिक मत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.  परळी तालुक्यातील बेलंबा येथे त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला.

प्रा. हरिश्चद्र गिते यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेलंबा येथे हरिसुख प्रतिष्ठानच्या वतीने समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामराव महाराज ढोक तर प्रमुख पाहूणे म्हणून आ.  आर. टी. देशमुख, आ. प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, केशवराव आंधळे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, तुकाराम महाराज शास्त्री, झोलकर महाराज यांची उपस्थित होते. अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता यावेळी करण्यात आली. 

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, की समाजातील वातावरण दिवसेंदिवस विविध घटनांमुळे प्रदूषित होत आहे. अशा परिस्थितीत संतांचा सत्संगच मानवी जीवनात मोलाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी हरिनामाची कास धरावी. स्वार्थाच्या पलिकडे जाऊन काम करणार्‍यांना नेहमी संघर्षाला सामोरे जावे लागते, असे असले तरी जीवनात तेच यशस्वी ठरतात, असेही त्या म्हणाल्या. जुगाडू वृत्तीमुळे आज देश मागे चालला आहे. 

दुसरे देश परग्रहावर वास्तवाच्या तयारीत असताना आपण मात्र स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही घरासमोर शौचालयच बांधत आहोत. आपला जिल्हा शंभर टक्के हागणदारीमुक्त झाला असला तरीही तशी गौरवाची बाब म्हणता येणार नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्रतस्थ राजकारणी असून त्यांनी देशाला घर मानले आहे, त्यांच्यामुळे देश आज प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्ह्यात दहा हजार कोटींचे राष्ट्रीय महामार्ग, दोन हजार 800 कोटींची रेल्वे, जलयुक्तची कामे अशी कामे आपण केल्याचेही यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.